काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली
पुणे बातमी

काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली

पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतरही त्यांची प्रकृती कठीण होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. पण, आज त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, आता अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

राजीव सातव यांच्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली होती.