या व्यक्तीमुळे सलमान अविवाहीत; ‘बिग बॉस’मध्ये स्वतःच केला खुलासा
मनोरंजन

या व्यक्तीमुळे सलमान अविवाहीत; ‘बिग बॉस’मध्ये स्वतःच केला खुलासा

मुंबई : एक अशी व्यक्ती आहे, जिच्यामुळे बॉलिवूड अभिनेता सलमान खान आजही अविवाहित असल्याचं म्हटलं जातं. बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या आठव्या पर्वात सलमानने त्या व्यक्तीचा खुलासा केला होता. ती व्यक्ती आहे एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा. रेखा यांनी त्यांच्या सुपर नानी या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सलमानने हा खुलासा केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रेखा आणि सलमान हे दोघंही मुंबईतील बँडस्टँड परिसरात राहतात. किशोरवयीन असताना मी मित्रांसोबत फिरल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील कट्ट्यावर झोपायचो आणि रेखा यांना मॉर्निंग वॉक करताना पाहण्यासाठी पहाटे साडेपाचला उठायचो, असं सलमान या शोमध्ये म्हणाला होता. त्यावेळी माझा योगसाधनेशी काहीच संबंध नव्हता. पण फक्त रेखाजी त्या क्लासमध्ये शिकायला यायच्या म्हणून मी तिथेसुद्धा जाऊ लागलो, असंही त्याने सांगितलं होतं.

यावेळी रेखा यांनीसुद्धा सलमानशी निगडीत एक आठवण सांगितली. सलमान जेव्हा सहा-सात वर्षांचा होता, तेव्हा मी मॉर्निंग वॉकला गेले असता तो सायकलने माझा पाठलाग करायचा. त्याला माहितीच नव्हतं की त्याच क्षणी त्याला माझ्यावर प्रेम जडलं होतं. घरी जाऊन त्याने सर्वांना सांगितलं होतं की मला त्या मुलीशी लग्न करायचं आहे, असं त्या म्हणाल्या. त्यावर सलमानने लगेच उत्तर दिलं, कदाचित म्हणूनच माझं अजूनही लग्न होऊ शकलं नाही.