छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्यदैवत; पण…
राजकारण

छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्यदैवत; पण…

ठाणे : छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्यदैवत आहे. मात्र सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे. त्यासाठीच्या आमच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यातच महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान. काही विषय असे असतात की त्यातून काही वेगळी वातावरण निर्मिती होऊ नये असे, आमचे धोरण आहे. असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ठाण्यात काँग्रेसच्या कार्यालयाच्या भेटीवेळी त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ”माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया’, असे थोरात यांनी नमूद केले होते.

ते पुढे म्हणाले की, ”महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. आम्हाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. त्याचवेळी आम्ही महाविकास आघाडीत आहेत. आम्ही प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने चर्चा करुन निर्णय घेऊ आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेऊ, असेही थोरात यांनी सांगितलं. तसेच, माझ्याकडे तीन महत्त्वाचे पदे असल्यामुळे सहाजीकच एकाचकडे या तीन पदाचा कोणालाही हेवा वाटणारच. मग पक्षश्रेष्ठींना वाटले तर ते यात विभाजन करु शकतात. ते अनेकांना संधी देऊ शकतात. पक्षात तरुण मंडळींना संधी द्यावी आणि नवे नेतृत्व घडवावे, त्यासाठी मी सुद्धा तयार आहे.