माझा होशिल ना’ मालिकेतील सई-आदित्यला पाहून चाहते म्हणाले, मेड फोर इच अदर
मनोरंजन

माझा होशिल ना’ मालिकेतील सई-आदित्यला पाहून चाहते म्हणाले, मेड फोर इच अदर

झी मराठीवरील ‘माझा होशिल ना’मध्ये मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातील आदित्य (विराजस कुलकर्णी) आणि सई (गौतमी देशपांडे) यांच्या अनेकांना आपल्या प्रेमाची झलक नक्कीच पाहायला मिळत असेल. सोशल मिडीयावरदेखील ही जोडी प्रचंड लोकप्रिय  झाल्याचे पाहायला मिळत आहे. विराजसने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट इंस्टाग्राम हँडलवर आलेला अनुभव शेअर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांचा देखील सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. मालिकेच्या शुटींगमधून वेळ काढून दोघेही आपल्या चाहात्यांशी संवाद साधत असतात. नुकतेच एका चाहत्याशी विराजसचा मजेशीर संवाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

झी मराठीच्या ‘माझा होशिल ना’ या मालिकेमधून आगामी रोमँटिक ट्रॅकची झलक शेअर करताना विराजसने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यावर त्याने लिहिले, “माझे डीएम या बीजीएम ट्रॅकसाठीच्या विनंत्यांनी भरले आहेत, म्हणून आम्ही त्याला एका पूर्ण गाण्यामध्ये बदलले आहे!” यावर एका चाहत्याने म्हंटले लिहिले की, “विराजस आणि गौतमी एकमेकांसाठी बनले आहेत जसे की आदित्य आणि सई.”

या टिप्पणीला उत्तर देताना विराजसने ‘शक्तीमान’चा संदर्भ देत लिहिले की,“मला आठवते, पूर्वी जेव्हा लोक छप्परांवरुन उडी मारून शक्तीमान आपल्याला अलगद झेलेल आणि जमिनीवर उतरवेल अशी वाट पहायचे. रील आणि रिअल जीवन खूप भिन्न आहे.” त्याच्या विनोदी उत्तरावर नेटकरी खूप खूश आहेत.

“तुजविण मीही अपुरी, तुजविण मीही आधा अन् अधुरा” हे खास गाणं सई-आदित्यसाठी तयार करण्यात आलंय. या गाण्याचे गीतकार अभिषेक खणकर असून आनंद जोशी आणि रोहित राऊत यांनी हे गाणं गायलं आहे. मालिकेतला हा विशेष भाग शनिवारी १९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.