निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा; अजित पवारांचा इतिहास पाहिला तर…
राजकारण

निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा; अजित पवारांचा इतिहास पाहिला तर…

मुंबई : “अजित पवार आज म्हणतात मला ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी काय केलं या ३० वर्षांत. शरद पवार यांना बाजूला करून अजित पवार यांनी केलेली एक वास्तू तरी दाखवा. त्यांना जे काही मिळालंय ते शरद पवार यांच्यामुळे.” अशी घणाघाती टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. तसेच, नुसतं भाजपावर टीका करून तुमचं काम सोप होणार नाही. तुम्हाला काम करून दाखवावं लागेल,” असा टोलाही राणे यांनी लगावला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी निलेश राणे यांनी आज संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. निलेश राणे म्हणाले, ”अजित पवार हे आता बोलायला लागलेत. अजित पवारांचा इतिहास पाहिला तर त्यात लोकोपयोगी कामं दिसणार नाहीत. घोटाळे, त्यांची वक्तव्य यामुळेच ते चर्चेत असतात. लोकोपयोगी कामांसाठी अजित पवार हे चर्चेत नसतात. एका वर्षानंतर मागे जे काही झालं त्यावरून लोकं मागचं विसरली असं अजित पवार यांना वाटत असावं. आज आमदारांना येण्यास जे ते सांगतायत त्यांना वर्षभरापूर्वी स्वत:चे आमदार टिकवता आले नाहीत. असा सणसणीत टोला राणे यांनी लागवला.

ते पुढे म्हणाले की, ” अजित पवार यांनी महाराष्ट्राला जे चित्र दाखवलंय ते महाराष्ट्र अजून विसरलेला नाही.घोटाळे, सिंचन, बँका, वक्तव्य, ते गप्प राहिले असते आणि पाच वर्ष उपमुख्यमंत्रीपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार हे स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे, असं म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

“तुम्ही आमच्याकडे या आम्ही निवडून देऊ, तुमच्याकडे तुम्हाला आमदार राखता आले नाहीत. त्यामुळे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन ते सरकार सोडावं लागलं. ज्यांच्याकडे एकही आमदार राहायला तयार नव्हता ते अजित पवार आम्हाला आठवतात. अजित पवारांची स्वत:ची ताकद नाही. अजित पवारांचा स्वत:चा आमदार आहे असं चित्र महाराष्ट्रात तरी नाही त्यामुळे त्यांनी मोठ्या गोष्टी करू नये,” असंही त्यांनी नमूद केलं.”