घरगुती गॅस दरवाढीवरून रुपाली चाकणकरांचा पारा चढला; थेट मोदी सरकारवरच साधला निशाणा
राजकारण

घरगुती गॅस दरवाढीवरून रुपाली चाकणकरांचा पारा चढला; थेट मोदी सरकारवरच साधला निशाणा

सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. अशातच आता गृहिणींचेही बेज्त पूर्णपणे कोलमडणार असल्याचं दिसत आहे. याच कारण म्हणजे चार दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. या कारणास्तव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल 3 वेळा गॅस सिलेंडर च्या किंमती मध्ये वाढ झाली ही अनुक्रमे 25,50,25 इतकी वाढवली गेली. स्वातंत्र्यनंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतकी वाढ केली गेली. हे कमी होते म्हणून की काय आज 1 मार्च रोजी पुन्हा 25 रुपयांनी गॅस दर वाढ सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांनी केली आहे. पंतप्रधान मोदीसाहेब, आपण देशावर अशी वेळ आणली आहे की आता ‘अश्यमयुगात’ सुद्धा नको तर मानवाची उत्पत्ती ज्याच्या पासून झाली त्या “माकडवस्थेत” जाऊन झाडावरची पान फुल खाऊन जगावं की काय…? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी विचारला आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात १०० रूपयांची वाढ झाली होती. यापूर्वी २५ फेब्रुवारी रोजी गॅसचे दर २५ रूपयांनी वाढले होते. त्यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी २५ रूपये, त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी ५० रूपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या महिनाभराच्या कालावधीत सिलिंडरच्या दरात झालेली ही चौथी वाढ झाली असून आज १ मार्चरोजी सिलिंडरच्या दरात २५ रूपयांची वाढली आहे.

तर विनाअनुदानीत सिलिंडरच्या दर २५ रूपयांनी वाढले आहेत. त्यानंतर मुंबईत घरगुती गॅसचे दर सिलिंडरचे नवे दर ८१९ रूपये इतके झाले आहेत. तर दिल्लीत गॅसचे दर ७९४ रूपयांवरून वाढून ८१९ रूपये, कोलकात्यात ८४५.५० रूपये आणि चेन्नईमध्ये नवे दर आता ८३५ रूपये झाले आहेत. जानेवारी महिन्यात कंपन्यांनी या दरात कोणतेही बदल केले नवते परंतु फेब्रुवारी महिन्यात सलग तीनदा हे दर वाढवण्यात आले.