फॅण्ड्रीनंतर जब्या करणार पदार्पण; सोमनाथचा येणार नवा चित्रपट
मनोरंजन

फॅण्ड्रीनंतर जब्या करणार पदार्पण; सोमनाथचा येणार नवा चित्रपट

मुंबई : फॅण्ड्रीचा जब्या आता परत एक नव्या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा २०१३ साली प्रदर्शित झालेला फॅण्ड्री हा चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. मात्र, या चित्रपटानंतर सोमनाथ अवघडे फारसा कुठे झळकला नाही. परंतु, सोमनाथ लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फ्री हिट दणका या आगामी मराठी चित्रपटात सोमनाथ झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो पहिल्यांदाच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटातील सोमनाथचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. यात सोमनाथच्या हातात बॅट दिसून येत आहे. त्यामुळे सोमनाथला या नव्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

दरम्यान, फ्री हिट दणका हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून यात सोमनाथसोबत अभिनेत्री अपूर्वा एस. ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर, अरबाज आणि तानाजी ही सैराटमधील मित्रांची जोडीदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनिल मगरे यांनी केलं आहे. तर, निर्मिती अतुल तरडे आणि आकाश ठोंबरे, मेघनाथ सोरखडे यांनी केली आहे.