तेलुगू अभिनेते टीएनआर यांचे कोरोनामुळे निधन
मनोरंजन

तेलुगू अभिनेते टीएनआर यांचे कोरोनामुळे निधन

चेन्नई : तेलुगू चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय यूट्यूब होस्ट, पत्रकार आणि अभिनेते टीएनआर उर्फ थुम्मुला नरसिम्हा रेड्डी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (ता. १०) सकाळी हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेते नानी यांनी टीएनआर यांच्या निधनाची माहिती दिली आहे. टीएनआर यांचे निधन झाले ऐकून धक्काच बसला. मी त्यांच्या काही मुलाखती पाहिल्या आहेत. त्यांचा एकंदरीत अभ्यास दांडगा होता. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

टीएनआर यांनी बोनी, नेने राजु नेने मंत्री, जॉर्ज रेड्डी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच चे फ्रँकली स्पिकिंग चॅनेलवर अनेक प्रसिद्ध कलाकारांची मुलाखत घेत असत. ते प्रचंड लोकप्रिय होते.