काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठरली तारीख; कोण होणार अध्यक्ष?
राजकारण

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठरली तारीख; कोण होणार अध्यक्ष?

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठी अखेर तारीख ठरली असून येत्या जून महिन्यातील २३ तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी निवडणूक तारखेची घोषणा केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसच्या २३ नेत्यांनी थेट गांधी घरण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटल होती. त्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता मावळली होती. अखेर कार्यसमितीच्या बैठकीत निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसला गांधी घरण्याऐवजी नवं नेतृत्व मिळाल्यास २०२४च्या लोकसभा निवडणुकीत तगडं आव्हान मिळू शकतं असं काँग्रेसमधील एका गटाचं म्हणणं आहे. सध्या काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी यांच्यावर बोट दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. आता काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.