कंगनाला झटका; जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाचे समन्स
मनोरंजन

कंगनाला झटका; जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाचे समन्स

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि प्रकरणाची पुढील चौकशी गरजेची असल्याचे पोलिसांनी सोमवारी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर न्यायालयाने कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जावेद अख्तर यांनी या प्रकरणी नोव्हेंबर महिन्यात कंगनाविरोधात तक्रार नोंदवली होती. तसेच तिच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने डिसेंबरमध्ये जुहू पोलिसांना या तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिले होते.

जुहू पोलिसांनी सोमवारी महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर चौकशीचा अहवाल सादर केला. त्यात कंगनाविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि प्रकरणाच्या पुढील चौकशीची गरज असल्याचे स्पष्ट केले. महानगरदंडाधिकारी आर. आर. खान यांनी पोलिसांनी सादर केलेला अहवाल वाचल्यावर कंगनाला समन्स बजावत प्रकरणाची सुनावणी १ मार्चला ठेवली आहे.