काम-धंदा

सोन्याच्या दरात घसरण; महिनाभरातील निचांकी दराची नोंद

नवी दिल्ली : सोन्याचांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. विदेशी बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 36 रुपयांच्या किरकोळ तेजीमुळे 48,460 रुपये प्रति तोळा झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान चांदीची वायदे किंमत 227 रुपयांनी अर्थात 0.32 टक्क्याच्या तेजीमुळे 71,475 रुपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान चांदीची वायदे किंमत 227 रुपयांनी अर्थात 0.32 टक्क्याच्या तेजीमुळे 71,475 रुपये प्रति किलो झाली आहे. एका महिन्याच्या निचांकी पातळीवर सोन्याचे दर- MCX वर सोन्याचे दर 0.11 टक्क्यांनी वाढून 48,476 रुपये प्रति तोळा झाले आहेत, जे गेल्या एका महिन्यातील निचांकी पातळीच्या जवळपास आहेत.

आधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी तर चांदीचे दर 0.8 टक्क्यांनी कमी झाले होते. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी तर चांदीचे दर 0.8 टक्क्यांनी कमी झाले होते. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी तर चांदीचे दर 0.8 टक्क्यांनी कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याचे दर चार आठवड्यातील निचांकी पातळीच्या जवळपास पोहोचले आहेत. स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्क्यांच्या घसरणीनंतर दर 1,855.12 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर चांदीच्या दरात 0.1 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर दर 27.62 डॉलर प्रति औंसवर आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर सध्या 1850 डॉलरच्या आसपास राहतील. जरी कमी झाले तर दर 1,800 डॉलरपर्यंत जाऊ शकतात.

नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 47,650 रुपये प्रति तोळा आहेत. चेन्नईमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचे दर 45,760 रुपये प्रति तोळा आहेत. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,600 रुपये प्रति तोळा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *