सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर
लाइफफंडा

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत असले तरी सध्या सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर उतरल्यामुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचे दर घसरले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज भारतीय बाजारात सोन्याचे दर 45 हजार प्रति तोळापेक्षाही कमी आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.1 टक्क्याने कमी होऊन 44 हजार 981 प्रति तोळा झाले आहेत. चांदीची वायदे किंमत देखील कमी झाली आहे. चांदीची किंमत 1.4 टक्केने कमी झाली आहे. यानंतर चांदीचे भाव 66 हजार 562 प्रति किलोग्राम झाले आहेत. तुम्ही जर सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

देशातील विविध शहरातील सोन्याचे दर
दिल्ली- 48,380 रुपये प्रति तोळा
मुंबई- 44,910 रुपये तोळा
चेन्नई- 46,340 रुपये प्रति तोळा
कोलकाता- 47,210 रुपये प्रति तोळा