घरच्याघरी ‘ब्लड शुगर’ कंट्रोल करण्याचे सोपे पर्याय
लाइफफंडा

घरच्याघरी ‘ब्लड शुगर’ कंट्रोल करण्याचे सोपे पर्याय

मधुमेह हा आजार भारतात मोठ्या प्रमाणावर पसरत चालला आहे. इतकंच नाही तर संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात मधूमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यात सर्व वयोगटाचे रुग्ण आढळून येतात. वाईट जीवनशैली आणि खाण्या-पिण्यातली अनियमितता यांमुळे मधूमेह होतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

(१) फळांचे सेवन:
मधूमेहात शुगर कंट्रोल करण्यासाठी अधिकाधिक फळांचं सेवन करणं महत्वाचं आहे. मात्र मधुमेह असताताना कोणती फळं खावीत आणि कोणती खाऊ नयेत याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो. मधूमेहाच्या रुग्णांसाठी अननस आणि कलिंगड हे दोन फळं सोडून सर्व फळं खाणं उपयुक्त आहे असं जाणकार सांगतात.

(२) लसूण खाल्यामुळेही होते शुगर कमी:
दररोज दोन लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने शरीरात इंसुलिन सेंसिटीव्हिटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील ब्लड शुगर कमी करण्यासाठी मदत होते. रोज २ लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यामुळे एका आठवड्याच्या आतमध्ये ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होते.

(३) तूळशीचे पानं खाल्ल्यामुळे येते शुगर कंट्रोलमध्ये
तुळशीचे पानं आपल्याला सहज उपलब्ध होते. याच तुळशीच्या पानांमुळे आपलं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. तुळशीच्या पानात असलेल्या अँटी ऑक्सिडंट्समुळे ब्लड शुगर कंट्रोल राहण्यास मदत होते.

(४) दालचिनी खाणे
कलमीच्या नियमित सेवनामुळे म्हणजेच दालचिनी खाण्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. दररोज दालचिनीची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्यामुळे शुगर एक आठवड्याच्या आत कंट्रोलमध्ये येते.

याचप्रकारे दररोज चालणे, एकाचवेळी जास्त जेवण न करता दिवसात २ तासांनी थोडं थोडं जेवणे, आपल्या जेवणात बाजरीच्या भाकरीचा आणि मेथीच्या भाजीचा समावेश ठेवणं देखील उपयुक्त ठरतं असं देखील डॉक्टरांचं म्हणणं आहे.