चाट अन् पान विक्रेते निघाले करोडपती; आयकर आणि जीएसटीच्या तपासणीत उघड
देश बातमी

चाट अन् पान विक्रेते निघाले करोडपती; आयकर आणि जीएसटीच्या तपासणीत उघड

कानपूर : कानपूरमध्ये रस्त्याच्या कडेला पान, चाट आणि समोस्याची गाडी लावणारे विक्रेते कोटींमध्ये खेळत आहेत. गल्ली बोळात छोटे-छोटे दुकानांचे मालक, किराणा मालाचे दुकानदार, औषध विक्रेते करोडपती आहेत. फळ विक्रेत्यांकडेही शेकडो बीघा शेतजमीन आहेत. परंतु हे ना आयकर भरतात ना जीएसटीच्या नावावर एक पैसा देतात. बिग डेटा सॉफ्टवेअर, आयकर विभाग आणि जीएसटी नोंदणीच्या तपासणीत रोडच्या कडेला गाडी लावून व्यवसाय करणारे २५६ जण करोडपती निघाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिसायला गरीब दिसणाऱ्या या धनदांडग्यांवर आयकर विभाग गुप्त नजर ठेऊन होता. केवळ आयकर भरणा आणि परतावा भरणाऱ्या करदात्यांची देखरेख करण्याशिवाय, विभाग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे कमवणाऱ्या अशा व्यापाऱ्यांचा डेटाही सतत गोळा करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गुप्त करोडपतींना पकडण्यास त्यांनी सुरवात केली आहे.

असा झाला भांडाफोड
प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा बरेच उत्पन्न वाढते तेव्हा प्रत्येक माणूस गुंतवणूकीचा मार्ग शोधत असतो. फेरीवाले, पान ठेल्यावाल्यांची जीवनशैली अतिशय साधी असते त्यामुळे त्यांचा खर्च मर्यादीत असतो आणि बचत जास्त असते. हा पैसा कोणत्याही विभागाच्या नजरेत येऊ नये म्हणून त्यांनी चलाकी दाखविली. विभागाच्या नजरेतून वाचण्यासाठी त्यांनी सहकारी बँकेत खाते उघडले. या मालमत्तेत बहुतांश गुंतवणूक भाऊ, मेव्हणी, काका, मामा आणि बहीण यांच्या नावावर केली गेली आहे. परंतु पॅनकार्ड स्वत:चे जोडले. केवळ एकाच मालमत्तेत पॅनकार्ड आणि आधार मिळताच त्यांचा भांडाफोड झाला आहे.