शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानातून ३०० ट्विटर हॅण्डल्सचा वापर
देश बातमी

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानातून ३०० ट्विटर हॅण्डल्सचा वापर

नवी दिल्ली : लोकांची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. अशी धक्कादायक माहिती सापदली असल्याचा दावा विशेष पोलीस आयुक्त (गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे. तसेच, प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत माहिती देताना दीपेंद्र पाठक म्हणाले की, दिल्लीतील शेतकरी आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी तसंच प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा हायजॅक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाकिस्तानमधील ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहे. आमच्यासाठी हे मोठं आव्हान असणार आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी काहीतरी मोठी समस्या निर्माण करु शकतात असा धोका आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानमधील ३०८ ट्विटर हॅण्डल्स Farmer Protest, Tractor Rally संबंधित हॅशटॅगचा सतत वापर करत आहेत,” अशी माहिती दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनातील नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका तरुणाला शुक्रवारी शेतकऱ्यांनी ताब्यात घेतला. माध्यमांसमोर त्याने हत्येच्या कटाची कबुलीही दिली. मात्र आता अचानक या तरुणाने घुमजाव करत शेतकऱ्यांनीच असं बोलण्यास भाग पडल्याचा आरोप त्याने केला आहे. या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तरुणाने केलेल्या घुमजावमुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

तथापि, आता पोलिसांसह क्राइम ब्रांचकडूनही त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथामिक माहितीनुसार हा तरुण 21 वर्षांचा असून आंदोलनाच्या ठिकाणापासून 50 किमी अंतरावरच्या सोनिपत गावचा रहिवाशी आहे. हा तरुण कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. त्याच्याकडून कुठली हत्यारंही पोलिसांना सापडलेली नाहीत. त्यामुळे पोलीस सध्या तरी या षडयंत्राबद्दल काही पुरावे मिळालं नसल्याचं सांगतायत पण पुढची चौकशी सुरु आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. यामध्ये खासकरुन पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आहेत. कायदे रद्द केले जावे ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी असून यावर ते ठाम आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मोर्चा काढला जाऊ नये अशी विनंती केली असताना शेतकरी मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.