फॉर्चून ऑयल से दिल की बीमारी नहीं होती, म्हणणाऱ्या गांगुलीला हार्ट अटॅक, मग अदानींनी केलं असं काही
देश बातमी

फॉर्चून ऑयल से दिल की बीमारी नहीं होती, म्हणणाऱ्या गांगुलीला हार्ट अटॅक, मग अदानींनी केलं असं काही

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका आला होता. सौरव गांगुलीची तब्येत आता सुधारत असून त्याला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. अशातच एक बातमी समोर आली असून गौतम अदानींची कंपनी अदानी विल्मरने फॉर्चूनच्या तेलावरील संशोधन थांबवले आहे. या संशोधनाच्या जहिरातीत सौरव गांगुलीला दाखवण्यात आले होते. गेल्या वर्षीच फॉर्च्यून तेलाच्या ब्रँडसाठी गांगुलीला ब्रँड अॅम्बेसिडर बनवण्यात आले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अदानी ग्रुपची कंपनी अदानी विल्मर ही या तेलाचे उत्पादन करते. या जहिरातीत गांगुलीद्वारा हे तेल आपल्या ह्रदयाची काळजी घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात तर याची मोठ्या प्रमाणात जहिरात करण्यात आली होती. आता सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्यावर अँजियोप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी या ब्रँडवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले होते. नेटीझन्सनी अदानी विल्मरच्या तेल उत्पादनावर टीका केली होती.

यानंतर कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील टीका पाहून कंपनीने सौरव गांगुली ब्रँड अम्बॅसिडर असलेल्या सर्व उत्पादनांचे संशोधन थांबविले आहे. या प्रकरणात पत्रकार आदेश रावल यांनी ट्वीट करत एक अदानी ग्रुपला चांगलाच टोला लगावला आहे.