नांदेडकरांसाठी अभिमानास्पद बातमी! व्ही. आर. चौधरी होणार हवाईदल प्रमुख
देश बातमी

नांदेडकरांसाठी अभिमानास्पद बातमी! व्ही. आर. चौधरी होणार हवाईदल प्रमुख

नवी दिल्लीः एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर एअर मार्शल व्ही. आर. चौधरी हे ३० सप्टेंबरला हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील. चौधरी सध्या भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. एअर मार्शल चौधरी यांचा २ डिसेंबर १९८२ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विभागात समावेश करण्यात आला होता आणि त्यांनी विविध स्तरांवर विविध कमांड, कर्मचारी आणि निर्देशात्मक नेमणुका केल्या आहेत, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एअर मार्शल चौधरी यांना आतापर्यंत सेवेदरम्यान परम विशिष्ठ सेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक आणि वायु सेना पदक देण्यात आले आहे. एअर चीफ मार्शल भदौरिया हे ३० सप्टेंबर २०१९ मध्ये हवाई दल प्रमुख झाले होते. आता भदौरिया हे या महिन्याच्या ३० तारखेला निवृत्त होतील. गेली दोन वर्षे ते हवाई दलाचे प्रमुख होते. एअर मार्शल चौधरी यांना ३,८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे आणि ते मिग -29 विमानांचे तज्ज्ञ आहेत. वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

असा आहे प्रवास
– एअर मार्शल व्ही. आर. चौधरी नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी
– २९ डिसेंबर १९८२ रोजी वायुसेनेत रुजू
– मिग आणि सुखोई लढाऊ विमान उडविण्याचा ३८०० तासांचा अनुभव
– वायुदलाचे उपप्रमुख होण्याआधी इथे वायुदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ
– संवेदनशील लडाखसह उत्तर भारतातील हवाई हद्दीच्या संरक्षणाची जबाबदारी पश्चिम विभागावर