शेतकरी आंदोलनाचा फटका; महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
बातमी विदेश

शेतकरी आंदोलनाचा फटका; महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

वॉशिंग्टन : कृषी कायद्यावरून पेटलेल्या शेतकरी आंदोलनाचे भारताबाहेर पडसाद उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा भारतीय दूतावासाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. कृषी कायद्यांचा विरोध करताना गटाने खलिस्तानी झेंड्यानं महात्मा गांधींचा चेहरा झाकून टाकला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय दूतावासाकडून या घटनेची माहिती देण्यात आली. शांती व न्यायाचं प्रतिक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा आम्ही निषेध करतो, असं दूतावासानं म्हटलं आहे. दूतावासानं अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशाबाहेरूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. मात्र, वॉशिंग्टनमध्ये कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आलेल्या काही खलिस्तानी समर्थक आंदोलकांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. वॉशिग्टनमधील भारतीय दूतावासासमोरील महात्मा गांधी मेमोरियल प्लाझासमोर असलेल्या गांधी पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. खलिस्तानी घटकांनी खलिस्तानी झेंडा पुतळ्यावर टाकत चेहरा झाकून टाकला.