विश्व दलित परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी वारे यांची नियुक्ती
बातमी महाराष्ट्र

विश्व दलित परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी वारे यांची नियुक्ती

औरंगाबाद : विश्व दलित परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. शिरिन वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २८) औरंगाबाद येथील सुभेदारी शासकीय विश्रागृहावर विश्व दलीत परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयाचे वकील शिरीन वारे यांची विश्व दलित परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विश्व दलित परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र पाल सिंह चमार यांनी दिलेले नियुक्ती पत्र डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते वारे यांना देण्यात आले. या बैठकीला प्रा. मंगेश घुसळे, ॲड. गजानन क्षिरसागर, ॲड. योगेश ढोबळे, ॲड. विष्णू पवार, ॲड. विशाल निकाळजे, ॲड. संजय घागरे, मंगेश होर्शिल, पंकज मेश्राम, आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ॲड. शिरीन वारे यांनी सांगितले की, समाजातील शेवटच्या घटकातील माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बोगस जातीचे प्रमाण पत्र घेऊन फायदा घेणाऱ्या सर्वांना संघटनेच्या माध्यमातून उघड करून त्यांना शिक्षेस पात्र ठरवून दिन-दलितांना न्याय देण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.