मोठा दिलासा ! राज्यातील नवीन रुग्णसंख्येत विक्रमी घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठा दिलासा ! राज्यातील नवीन रुग्णसंख्येत विक्रमी घट

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वचजण त्रासलेले असताना मोठा दिलासा मिळाला असून राज्यातील नवी रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट झाल्याचे आज (ता. ३०) पाहायला मिळाले आहे. आज राज्यात १८ हजार ६०० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, गेल्या २४ तासांत ४२० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात येत आहे. ५० ते ६० हजारांवर पोहोचलेली रुग्णसंख्या आता नियंत्रणात येत आहे. लॉकडाऊन व लसीकरण यामुळं कोरोना संसर्गाला आळा बसवण्यात यश येत असल्याचं चित्र आहे. आज राज्याला कोरोनासंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे. कालच्या तुलनेत आज नवीन रुग्णांच्या आकड्यात विक्रमी घट झाली आहे. त्याचबरोबर राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १. ६५ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४८ लाख ६१ हजार ६०८ चाचण्यांपैकी ५७ लाख ३१ हजार ८१५ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. २२ हजार ५३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत ५३ लाख ६२ लाख ३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट ९३.५५ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १९ लाख ९८ हजार ९७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर १२ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.