संतप्त शेतकऱ्यांची भाजप आमदाराला मारहाण
देश बातमी

संतप्त शेतकऱ्यांची भाजप आमदाराला मारहाण

चंदीगडः पंजाबमध्ये मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये शेतकऱ्यांचा संतप्त गटाने भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला मारहाण केली. एवढचं नव्हे तर आमदाराचे कपडेही फाडले. अबोहरमधील आमदार अरुण नारंग हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मलोट येथे गेले होते. शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजप आमदाराला झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकऱ्यांच्या माराहाणीदरम्यान पोलिसांनी नारंग यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तर काही लोकांनी आपल्याला मारहाण केली आणि अंगावर काळी शाई फेकली, असं भाजप आमदार नारंग यांनी यांनी सांगितलं आहे. आपण माध्यमांशी संवाद साधण्यासाठी मलोट येथे निघालो होतो. पण आंदोलन करणाऱ्यांनी आपल्याला विरोध केला. ते हिंसक झाले आणि त्यांनी मला घेरलं, असं त्यांनी सांगितलं.

या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिदर सिंग यांनी भाजप आमदाराला झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. राज्यात शंतात बिघडवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा मुद्दा लवकर सोडवण्याचं अमरिंदर सिंग यांनी आवाहन केलं. दरम्यान, पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलानेही या घटनेचा निषेध केला आहे.