संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन
बातमी मराठवाडा

संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन

औरंगाबाद : मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर (वय ८७) यांचे आज (ता. २८) औरंगाबादमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नाथराव नेरळकरांनी मराठवाड्यात संगीत साधना केली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी संगीत शिक्षणाचे धडे घेतले व त्यानंतर संगीत शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य व्यतित केले. २०१५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची सन्मानाची फेलोशिप मिळाली होती. दिल्लीत त्यांचा सन्मान झाला होता. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

नाथराव नेरळकर यांचं जन्मगाव नांदेड आहे. त्यांच्या पश्चात अनंत व जयंत नेरळकर ही दोन मुले, हेमा नेरळकर-उपासनी ही मुलगी आणि सून, नातवंडे, असा परिवार आहे.