मुलाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू; भाजप आमदाराचे पोलिसांकडे हेलपाटे
देश बातमी

मुलाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू; भाजप आमदाराचे पोलिसांकडे हेलपाटे

लखनौ : उत्तर प्रदेशात भाजप शासित सरकार असूनही भाजपच्याच आमदाराला तक्रारीसाठी पोलिसांत हेलपाटे मारावे लागत आहेत. उत्तर प्रदेशातील संडीलातून भाजप आमदार असलेले राजकुमार अग्रवाल महिनाभरापासून एका खासगी रुग्णालयावर तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात हेलपाटे मारत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आमदरा असूनही त्यांना कुणीही दाद देत नसल्याचं चित्र आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली. मात्र अद्याप त्यांना कुणीही दाद दिलेली नाही. २२ एप्रिलला काकोरीच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्या मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या ३० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. २६ एप्रिलला त्यांचा मुलाचा जीव गेला. मुलाचा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप आमदार राजकुमार अग्रवाल यांनी केला आहे.

२६ एप्रिलला मुलांचं ऑक्सिजन लेव्हल ९४ इतकं होतं. तो जेवणही करत होता. संध्याकाळी अचानक डॉक्टरांनी सांगितलं त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे. त्याच्यासाठी आम्ही दोन ऑक्सिजन सिलेंडरचा बंदोबस्त केला. मात्र डॉक्टरांनी ऑक्सिजन सिलेंडर त्याच्यापर्यंत पोहोचू दिले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप भाजप आमदार राजकुमार अग्रवाल यांनी केला आहे.

त्या दिवशी रुग्णालयात ७ जणांचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार मी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना दिली. मात्र अद्याप माझी तक्रार दाखल करून घेतलेली नाही. माझी मागणी आहे की, पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज चेक करावं आणि हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.