लॉकडाऊनमध्ये ‘या’ दहा खासदारांनी केलीय सर्वात जास्त मदत; पाहा यादी
देश बातमी

लॉकडाऊनमध्ये ‘या’ दहा खासदारांनी केलीय सर्वात जास्त मदत; पाहा यादी

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातच नव्हे तर जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर अनेक जणांचा जॉब गेला होता. यात अनेक राजकीय नेत्यांनी समोर येत लोकांना मदत केली होती. अशात राजधानी दिल्ली स्थित सिटीझन एन्गेजमेंट प्लॅटफॉर्म गव्हर्नआय या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात भारतात लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक मदत केलेल्या १० खासदारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या यादीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि भाजपचे नेते केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे. १ ऑक्टोबर रोजी सुरु करण्यात आलेल्या सर्वेक्षणासाठी लोकसभेतील २५ खासदारांची निवड झाली होती. या सर्वेक्षणासाठी मिळालेल्या अर्जांच्या आधारावर ही अंतिम २५ नावे निश्चित करण्यात आली होती. यातून प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्रायातून सर्वाधिक मदत केलेल्या टॉप खासदारांची यादी तयार करण्यात आली आहे. एकूण ५१२ लोकसभा खासदारांसाठी १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ३३,८२,५६० लोकांचे वैध अभिप्रायांची पडताळणी यावेळी करण्यात आल्याचं GovernEye संस्थेने सांगितलं.

खासदारांची यादी पुढीलप्रमाणे
अनिल फिरोजिया (भाजप)
अडाला प्रभाकर रेड्डी (वायएसआरसीपी)
राहुल गांधी ( काँग्रेस)
महुआ मोइत्रा (टीएमसी)
एल. एस. तेजस्वी सूर्या (भाजप)
हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना)
सुखबीर सिंग बाद (एसएडी)
शंकर लालवानी (भाजप)
डॉ. टी. सुमाती थमीझाची थांगापांडियन (डीएमके)
नितीन गडकरी (भाजप)