शिवसेनेसोबतच्या भविष्यातील युतीबाबत अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…
राजकारण

शिवसेनेसोबतच्या भविष्यातील युतीबाबत अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेबरोबरच्या भविष्यातील युतीबाबत महत्वपूर्ण विधान केले असून त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचा आदेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पवार म्हणाले, आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या, अशा स्पष्ट सूचना पवार यांनी आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. पराभूत झालेल्या उमदेवारांना मिळालेली मतं, त्यांचं मतदारसंघातील वजन, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागात पक्षाची काय स्थिती आहे, यासह उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा करून त्यावर मार्ग काढण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.