मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही
पुणे बातमी

मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही

पुणे : राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने गुरुवारी पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरातच ही परीक्षा घेतली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर विद्य्राथ्यानी हे आंदोलन घेतले. तर आज सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांना ‘एमपीएससी’च्या परीक्षांबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवार म्हणाले मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही, या त्यांच्या मिश्किल टिप्पणी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पवार म्हणाले, माझ्या मते एमपीएससीचा विषय आता संपलेला आहे. काल जे काही घडले दिले ते दुर्दैवी होते. विद्यार्थ्यांच्या संताप आणि भावना योग्यच आहे. पण काहीजण त्यात राजकारण करू पाहत आहे.पण आम्ही विद्यार्थ्यांबरोबर आहोत. काल मुख्यमंत्र्यांनी देखील एमपीएससी बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ” राजकारण आणण्याची गरज नाही. एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. त्याच्यात काहींनी राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. आमचा एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे मात्र सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचा प्रयत्न झाला. त्यासंदर्भात मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी एमपीएससीला सांगून विद्यार्थ्यांच्या बाबतीत वातावरण अशा पद्दतीने खराब करणं योग्य नसल्याचं सांगितलं.

दरम्यान, पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज (ता.१२) कोरोना आढावा बैठक घेतली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, महापौर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पवार नेमके कुठले पाऊल उचलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. या बैठकीत शहरातील सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेत निर्णय घेतल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

१४ मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. आणि या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली. याच रोषातून ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व ‘एमपीएससी’चा तीव्र निषेध व्यक्त केला होता.