मोदींच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्याची घरात घुसुन हत्या
देश बातमी

मोदींच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्याची घरात घुसुन हत्या

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात वाराणसीत भाजप कार्यकर्त्याची घरात घुसुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसोबत जबरदस्ती होळी खेळणाऱ्याला विरोध केल्याने ही हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. राजू राजभर असं या ३५ वर्षीय भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजू राजभर यांचं परिसरातील काही जणांसोबत शत्रुत्व होतं. हे सर्वजण राजू राजभर यांच्या पत्नीसोबत जबरदस्तीने होळी साजरी करत होते. राजू राजभर यांनी विरोध केला असताना तब्बल २० जणांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये इतर चारजण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीसोबत होळी साजरी करण्यावरुनच राजू आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. अनेक भाजप कार्यकर्ते राजू यांच्या घरी होळी साजरी कऱण्यासाठी आले होते. यानंतर आरोपींनी राजू यांना धडा शिकवण्याचं ठरवलं. २० जणांनी मिळून राजू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर काठ्या आणि रॉडने हल्ला केला. यामध्ये राजू राजभर यांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील चार सदस्य जखमी झाले. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.