राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन
देश बातमी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 2017 सालातील कोर्ट गाजलेल्या कोर्ट सिनेमातील वीरा साथीदार यांचं करोनाने निधन झालं आहे. कोर्ट या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमा चांगलाच गाजला होता. वीरा साथीदार यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वीरा साथीदार यांनी १९ मार्चला कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. १० दिवसानंतर ते करोना संक्रमित झाले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोर्ट सिनेमात पहिल्यांदा अभिनय
वीरा साथीदार यांनी कोर्ट सिनेमात पहिल्यांदा अभिनय केला. कोर्ट सिनेमासाठी दोनशे लोकांचं ऑडीशन घेण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी वीरा साथीदार यांना विचारण्यात आलं आणि त्यांनी होकार दिला. यापूर्वी आंबेडकर चळवळीत वीरा साथीदार सामिल झाले होते. त्यामुळे चळवळ सोडून अभिनयात तुम्ही तग धरू शकणार नाही अशी टीका अनेकांनी त्यांच्यावर केली होती. मात्र हा सिनेमा लोकप्रिय ठरला. या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं. एवढचं नाही तर सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली. बेस्ट फॉरेन फिल्म या श्रेणीत कोर्ट सिनेमाची निवड झाली होती. शिवाय सिनेमातील वीरा साथीदार यांच्या अभिनयाच भरपूर कौतुक झालं. या सिनेमात नारायण कांबळे ही मुख्य भूमिका त्यांनी साकारली होती.