कोरोनाची तिसरी लाट अटळ; वैज्ञानिक सल्लागारांचा इशारा
देश बातमी

कोरोनाची तिसरी लाट अटळ; वैज्ञानिक सल्लागारांचा इशारा

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, तिसरी लाट अटळ असून त्यासाठी आपण सतत खबरदारी घेतली पाहिजे, असे केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विजयराघवन म्हणाले, ‘कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. याचे मुख्य कारण विषाणू अजून मोठ्या प्रमाणात फिरत आहे. पण ही लाट केव्हा येईल, तिचे स्वरूप काय राहील हे सांगणे कठीण आहे. सध्याच्या कोरोना विषाणू प्रकारावर आताच्या लशी परिणामकारक आहेत. मात्र अजूनही कोरोनाचे नवे विषाणू येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही विजयराघवन यांनी व्यक्त केली. जगभरात नवीन विषाणू प्रकार येतील त्याप्रमाणेच ते भारतातही येतील. त्यामुळे संक्रमणही वाढेल, असे असले तरी या केव्हातरी संसर्गाचा आलेख सपाट होणारच आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान त्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांमध्ये ढिलाई करता कामा नये. प्रतिकारशक्तीला चकवा देणारे विषाणू धोकादायक ठरू शकतात. कोरोना संसर्गाचे रूप हे त्यावरून ठरणार आहे, असे के. विजयराघवन यांनी सांगितले आहे.