हार्दिक पटेल यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन
देश बातमी

हार्दिक पटेल यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

अहमदाबाद : गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दीक पटेल यांचे वडील भरत पटेल यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. अहमदाबादमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हार्दीक पटेल यांनाही करोनाची लागण झाली असून २ मे रोजी त्यांनी करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भरत पटेल यांच्या निधनाच्या बातमीनंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी फोनवरून हार्दीक पटेल यांच्याशी संवाद साधत संवेदना व्यक्त केल्या. गुजरातमधील परिस्थिती भीषण असून गेल्या २४ तासात ११ हजार ८९२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या ६ लाख ६९ हजार ९२८ वर पोहोचली आहे. तर एका दिवसात ११९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये ८ हजार २७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ४३ हजार ४२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

५ लाख ५० हजारपेक्षा अधिक एकूण कोरोनाबाधित संख्या असलेली राज्यामध्ये गुजरात राज्य मोडतं. या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्राकडून देखील पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकारने रविवारी २५ राज्यांसाठी मोठा निधी जाहीर केला. केंद्राने २५ राज्यांमधील पंचायतींना ८९२३.८ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. गुजरातला ४७२.४ कोटी इतकं अनुदान मिळालं आहे.