विरुष्काच्या आवाहनाला प्रतिसाद देत चहलची कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत
क्रीडा

विरुष्काच्या आवाहनाला प्रतिसाद देत चहलची कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी शुक्रवारी एक मदत निधी उभारला आहे. त्याचबरोबर या जोडप्याने २ कोटी रुपयांची देणगी दिली आणि सांगितले की ७ कोटी रुपये संकलित करण्याची त्यांची अपेक्षा आहे. हा निधी देशभरात ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्यास मदत करेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने पुढे येत या मदत निधीला ९५,००० रुपयांची देणगी दिली आहे. हरियाणाचा हा लेगस्पिनर कोहलीचा जवळचा मानला जातो. २०१४च्या आयपीएल हंगामापासून हे दोघेही एकत्र आरसीबीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

तत्पूर्वी, आयपीएल २०२१चा हंगाम अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर चहल घरी परतला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघात चहलला स्थान मिळवता आलेले नाही. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेपासून चहलचा फॉर्म हरवला आहे. आयपीएल २०२१पूर्वी चहलला खराब कामगिरीमुळे भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय सामन्यातील अंतिम अकरा संघातून वगळण्यात आले होते.