पुणेकरांसाठी मोठी बातमी ! पुण्यातील कोरोग्रस्तांची संख्या ५००च्या खाली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

पुणेकरांसाठी मोठी बातमी ! पुण्यातील कोरोग्रस्तांची संख्या ५००च्या खाली

पुणे : कोरोनाने सगळीकडे हाहाकार केला असताना पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. पुणेकर कोरोनावर विजय मिळवत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी पुण्याला प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी पुण्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही 500च्या आत असल्याचं पाहायला मिळालं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संपूर्ण देशात कोरोनाचा अत्यंत झपाट्यानं विकास होणाऱ्या जिल्ह्यांच्या नकोशा यादीत देखिल पुण्याला स्थान मिळालं होतं. पण एवढी गंभीर परिस्थिती झाल्यानंतरही पुणे महानगरपालिका प्रशासनाने अत्यंत योग्यरित्या नियोजन करून कोरोनाला आळा घालण्यात यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच परिमाण म्हणजे सोमवारी पुण्यात नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा अवघा 494 होता. त्यामुळं 500 च्या आत रुग्णसंख्या असल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

पुण्यात गेल्या सोमवारी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा विचार करता हा आकडा जवळपास रुग्णांच्या तिप्पट म्हणजे 1410 एवढा होता. सोमवारी पुण्यात झालेल्या कोरोनाच्या एकूण चाचण्यांचा आकडा हा 7582 एवढा होता. रविवारी केलेल्या चाचण्यांचा आकडा त्या मानानं कमी असतो. त्यामुळं सोमवारचा आकडा कमी येण्याचा ट्रेंडही पाहायला मिळतो. पण रुग्णसंख्या कमी झाल्यानं पुण्याच्या महापौरांनीही आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रेयत याला Huge Relief म्हणजेच मोठा दिलासा असं म्हटलं आहे. सक्षमपणे लढू, कोरोनाला हरवू, असं म्हणत त्यांनी कोरोना विरोधातील लढ्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या पाच दिवसांत सातत्यानं घट झाल्याचा ट्रेंड पाहायला मिळाला. पुण्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता, 20 मे रोजी 931, 21 तारखेला 973, 22 मे रोजी 840 तर रविवारी 21 मे रोजी 709 एवढी होती. मात्र सोमवारी हा आकडा आता 500 च्याही खाली आला आहे.