दिलासादायक बातमी! कोव्हॅक्सिन भारत आणि ब्रिटेन स्ट्रेनवर प्रभावी
देश बातमी

दिलासादायक बातमी! कोव्हॅक्सिन भारत आणि ब्रिटेन स्ट्रेनवर प्रभावी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज चार हजार रुग्णांचा मृ्त्यू होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. कोणती लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी यावरून प्रश्न विचारले जात होते. आता कोव्हॅक्सिन लस भारत आणि ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील (B.1.617) आणि ब्रिटनमधील (B.1.1.7) या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावीपणे मात करत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संशोधन विभाग यांच्या माध्यमातून या स्ट्रेनवर सखोल अभ्यास केला. त्यानंतर भारत बायोटेकच्या सह संस्थापक सुचित्रा इला यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी हे ट्वीट पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना टॅग केलं आहे.

देशात सध्या तीन लशींचं लसीकरण सुरु आहे. सीरम इंस्टीट्यूटद्वारे तयार केलेली कोविशील्ड, भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन आणि रशियातून आयात केलेल्या स्पुटनिक व्ही लशींचा यात समावेश आहे. आतापर्यंत देशात १८ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.