स्वदेशी ‘पिनाका’ रॉकेटची चाचणी यशस्वी
देश बातमी

स्वदेशी ‘पिनाका’ रॉकेटची चाचणी यशस्वी

पुणे : स्वदेशी बनावटीच्या ‘पिनाका’ रॉकेटची शुक्रवारी यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. डीआरडीओने ओडिशाच्या समुद्रकिनारी असलेल्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये ही चाचणी घेतली. यावेळी 25 रॉकेट सोडले गेले आणि ते सर्व रॉकेट्स लक्ष्य भेदण्यात देखील यशस्वी ठरले. हे रॉकेट 45 किमीपर्यंत टार्गेट उद्धवस्त करण्यात यशस्वी ठरले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यातील अर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅबिलिशमेंटन आणि हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरटरीने ही रॉकेट यंत्रणा विकसित केली आहे. पिनाका रॉकेटची लाँचिंग यंत्रणा ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार केली आहे. पिनाका डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑफ डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑरगायनेझशन ही एलअँडटीच्या मालकीची आहे.

डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी या मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.