दिल्लीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांनी खळबळ; दोन पुरुष, तीन महिलांना अटक
देश बातमी

दिल्लीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांनी खळबळ; दोन पुरुष, तीन महिलांना अटक

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र दिल्लीतच पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या खान मार्केट भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या प्रकरणी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास दोन पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री एकच्या सुमारास तुघलक रोड पोलीस ठाण्याचा फोन खणखणला. खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ काही जण ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत आहेत, अशी तक्रार मिळाली. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. या प्रकरणात पोलिसांकडून दोन पुरुष, तीन महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे.

तपास अधिकारी घटनास्थळी पोहचले त्यावेळी दोन पुरुष, तीन महिला बाईकवर बसले होते. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केल्यानंतर आम्ही इंडिया गेट परिसर पाहण्यासाठी आलो आहोत. आम्ही बाईक भाडयावर घेतल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

“बाईक हातात असल्याने वेगात बाईक पळवण्याची आम्ही शर्यत लावली होती. त्यावेळी आम्ही परस्परांचा वेगवेगळया देशांच्या नावांवरुन पुकार करत होतो. एक जण त्यातला पाकिस्तानातून आला होता. त्याने पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिली” असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.