लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी फरार असलेल्या दीप सिद्धूला अटक
देश बातमी

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी फरार असलेल्या दीप सिद्धूला अटक

नवी दिल्ली : लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धूला अटक झाली आहे. १४ दिवसांपासून फरार असलेल्या दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान घडलेल्या लाल किल्ला हिंसाचार घटनेतील तो मुख्य आरोपी आहे. दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं दीप सिद्धू याला अटक केली आहे.

२६ जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू फरार होता. ट्रॅक्टर रॅली दरम्यान आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना नियोजित मार्गावरून दुसऱ्या मार्गावर नेण्याचा तसंच शेतकऱ्यांना चिथावण्याचा प्रयत्न केल्याचा सिद्धू याच्यावर आरोप आहे.

लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेनंतर जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांच्या तावडीतून निसटून दीप सिद्धू फरार झाला होता. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शेतकरी संघटनांनी दीप सिद्धू हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला होता.