लस घेतल्यावरही कोरोना होतो, मात्र लसीचा फायदा होतो; लस घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लस घेतल्यावरही कोरोना होतो, मात्र लसीचा फायदा होतो; लस घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस घेतली तरी त्या व्यक्तीला कोविड विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एकदा लस घेतली, की मास्क वापरण्याची तसेच सोशल डिस्टंसिंगची गरज नाही असा गैरसमज करून घेऊ नये. कोरोना लस ही सुरक्षा कवच आहे असे समजून चालण्याचे कारण नाही. ही लस घेतल्यामुळे केवळ आजाराचे स्वरूप गंभीरतेकडे झुकून त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही, शिवाय मृत्यूंचे प्रमाण कमी होईल त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी आणि स्वतःला सुरक्षित करावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात लस घेतलेल्या अनेक व्यक्तींना कोरोना संसर्ग होत आहे. गेल्या दोन महिन्यात अशी अनेक प्रकरणे सामोरी आली आहेत. लस घेतली की, कुठलीच काळजी करण्याचे कारण नाही हा समज योग्य नाही. केंद्र सरकारने म्हटले आहे, की कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. लोकांनी अफवांना बळी पडू नये. अनेक तज्ज्ञांनी हे मान्य केले आहे, की कोरोनाची लस हे त्या रोगाविरोधातील सुरक्षा कवच नाही. केवळ त्यामुळे आजाराची गंभीरता कमी होऊन रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाही.

लसीकरणानंतरही काहींना करोनाची लागण झाली आहे. दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही कोरोना झाल्याची उदाहरणे आहेत. लशीमुळे व्यक्तीची लक्षणे गंभीर होत नाहीत इतकाच फरक आहे. फॉर्टिस रुग्णालयातील पल्मनोलॉजी सल्लागार डॉ. रिचा सरीन यांनी सांगितले, की दोन्ही मात्रा दिल्यानंतरच प्रतिपिंड पूर्ण तयार होतात. त्यामुळे पहिल्या मात्रेनंतर संसर्ग होऊ शकतो.