लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखीनच बिघडली; दिल्लीच्या एम्समध्ये दाखल
देश बातमी

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखीनच बिघडली; दिल्लीच्या एम्समध्ये दाखल

रांची : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची तब्येत आणखीनच बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ढासळत चालल्याने अधिक चांगले उपचार मिळावेत या दृष्टीने रिम्समधील डॉक्टरांनी त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लालू प्रसाद यांदव यांना काय झालं आहे?
लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली होती.

रिम्स रूग्णालयातून लालू प्रसाद यादव यांना दिल्लीच्या एम्समध्ये शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हलवण्यात आले. शनिवारी सायंकाळी लालू यांना रूग्णवाहिकेने बिरसा मुंडा विमानतळावर नेण्यात आले. तेथून हवाई रूग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना दिल्लीला नेण्यात आले. विमानतळावर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव व तेजप्रताप यादव तसेच मुलगी डॉ. मिसा भारती सारेच जण हजर होते. तेथून त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले.