मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेला शेतकरीच मोदींच्या विरोधात
देश बातमी

मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेला शेतकरीच मोदींच्या विरोधात

नवी दिल्ली : गेल्या १० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारशी सातत्याने अपयशी होणाऱ्या चर्चा आणि कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी दिल्ली आणि एनसीआरमध्ये धरणे आंदोलनाला बसले आहेत. अशात मन की बात कार्यक्रमात उल्लेख केलेलाच शेतकरी मोदींच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पीएम मोदींनी मन की बात कार्यक्रमात महाराष्ट्रातील एक शेतकरी जितेंद्र भोइजी यांचे उदाहरण देत दावा केला होता की नवी कृषी कायदाचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. त्यांना नवी कृषि कायद्यामुळे एका व्यापाऱ्याकडे अडकलेले त्यांचे पैसे वापस मिळाले आहेत. परंतु पंतप्रधान मोदीद्वारा केल्या गेलेल्या या दाव्यावर जितेंद्र भोइजी यांनी आक्षेप घेत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून नव्या कायद्यामुळे फायदा झाल्याचा त्यांनी इन्कार केला आहे. त्यांनी म्हटले आहेल की. भलेही मला नवीन कायद्यामुळे व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे मिळाले असतील परंतु, नव्या कृषी कायद्यामुळे एमएसपी न मिळाल्याने 2 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मी दिल्लीत शेतकरी करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आहे.

दरम्यान, रविवारी सकाळपासूनच शेतकरी दिल्लीच्या सिंघु, टीकरी, दिल्ली गाजियाबाद, चिल्ला आणि इतर सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. शनिवारी पुन्हा एकदा सरकारसोबत चर्चा निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र भावना आहेत. दिल्लीच्या सीमांवर असलेल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणाच केली आहे. मागण्यापूर्ण झाल्याशिवाय मागे फिरणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.