धक्कादायक : महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरु; मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा गौप्यस्फोट
राजकारण

धक्कादायक : महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरु; मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा गौप्यस्फोट

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील आणि राजस्थानातील सरकार पडण्यासाठी भाजपा कट रचत आहे. असा आरोप गेहलोत यांनी केला आहे. गेहलोत यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एवढचं नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांना भेटल्याचा दावाही अशोक गहलोत यांनी केलाय. देशात पाच सरकारं पाडली असून राजस्थान सरकारही पाडणार, असं भाजपच्या वतीने काँग्रेस आमदारांना सांगण्यात आल्याचंही अशोक गहलोत म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सिरोही जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटना दरम्यान गहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याबाबत बोलताना गेहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप केला आहे. अमित शहा यांनी कॉंग्रेस नेत्यांची एक बैठक घेतली. या बैठकीला कॉंग्रेस आमदारांना सांगण्यात आले की पाच सरकारे पाडण्यात आली आहेत. आता सहावे सरकार पडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर भाजपा नेता धर्मेंद्र प्रधान त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी न्यायाधीशांशी बोलणे सुरू असल्याचे सांगत होते. महाराष्ट्र सरकार पडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत तर राजस्थानातही सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होतायावेळीही काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला होता. सचिन पायलट यांनी 19 आमदारांसोबत पक्षाविरोधात बंड पुकारला होता. याचीही त्यांनी आठवण करून दिली. तथापि, अशोक गेहलोत यांचा दावा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षाकडून सरकार पडण्यासाठी होत असलेले दावे लक्षात घेता आता राज्यसरकार यावर काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.