नव्या वर्षात सोन्याच्या दरांनी गाठला विक्रमी उच्चांक
देश बातमी

नव्या वर्षात सोन्याच्या दरांनी गाठला विक्रमी उच्चांक

नवी दिल्ली : नव्या वर्षात सोन्या चांदीच्या दराला नवी झळाळी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातल्या व्यवहाराच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचा दर 51 हजारांपलिकडे गेलेला पाहायला मिळाला. तर चांदीचा दर 70 हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांच्या मनात संभ्रम कायम आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजधानी दिल्लीत सोमवारी 10 ग्राम सोन्यावर 877 रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आज सोने खरेदीसाठी तब्बल 50 हजार 619 रूपये मोजावे लागत आहेत. तर मागील बाजारात सोन्याचे दर 49 हजार 742 रूपये ऐवढे होते. सोन्यासोबतच चांदीचे भाव देखील वधारले आहेत. प्रति किलोमागे चांदीच्या दरांत 2 हजार 12 रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज बाजारात चांदीचा दर 69 हजार 442 रूपये आहे. त्यामुळे सोने आणि चांदीची खरेदी करायला हवी की नको असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उतार होत आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करायला हवी की नको असा प्रश्न ग्राहकांसमोर उभा राहत आहे. तर दुसरीकडे नव्या वर्षातल्या व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशीही शेअर मार्केटमध्ये तेजी तसंच विक्रमी क्लोजिंग पाहायला मिळाली. सेन्सेक्स सलग 9व्या दिवशी तेजीत बंद झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स पहिल्यांदाच 48 हजारापार बंद झाला. निफ्टी प्रथमच 14 हजारापलीकडे बंद झाला आहे.