सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण
देश बातमी

सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण

नवी दिल्ली : सोन्याचे भाव दररोज कमी जास्त होताना दिसतात. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज कालच्या एवढीच आहे. आजची किंमत ४५,३९० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४५,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,३०० रुपये प्रति किलोने विकली जाईल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४६,३९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,३९० रुपये झाला आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,३९० एवढा झाला आहे. पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७२० प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४४,५७० रुपये इतका आहे. सोन्याच्या बाजारपेठेतलं आणखीन एक महत्त्वाच शहर म्हणजे नागपूर. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,३९० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,३९० रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,७२०० आहे व २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४४,५७० रुपये एवढा आहे.

गुडरिटर्नस या वेबसाईटनुसार आजचा मुंबईतील चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ५९३ रुपये आहे. पुण्यासाठी १० ग्रॅमसाठी दर ५९३ रुपये असा आहे. नागपूर आणि नाशिकमध्येही चांदीचा दर हा १० ग्रॅमसाठी ५९३ रुपये आहे.