गुड न्यूज! २७ जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु
बातमी महाराष्ट्र

गुड न्यूज! २७ जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु

राज्यात येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. आता सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात विद्यार्थ्यान्माधेय उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात शाळा सुरु होणार आहेत. अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते.”

तसेच, शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना करोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, गेल्यावर्षी २३ मार्च २०२० पासून राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आला. तेव्हापासून शाळा बंदच होत्या. तर जून महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरु होत असताना विद्यार्थी आणि शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय देण्यात आला. तेव्हापासून शिशु, बालवर्गापासून ते उच्चशिक्षणाचे वर्ग ऑनलाइन होत आहेत. पण आता पुन्हा पूर्वीप्रमाणे शाळा सुरु होणार आहेत.