मोठी बातमी ! क्रिकेटपटू हरभजन सिंग पुणेकरांसाठी करणार मोठे काम
पुणे बातमी

मोठी बातमी ! क्रिकेटपटू हरभजन सिंग पुणेकरांसाठी करणार मोठे काम

पुणे : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने पुणेकरांसाठी एक मोठे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजनने पुण्यात मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. ही प्रयोगशाळा आज (ता. २४)पासून सुरू झाली आहे. आयपीएल २०२१मध्ये हरभजन सिंग कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत असून त्याने याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून फक्त एक छोटेसे कार्य करत आहोत. मला आशा आहे, कि वाहेगुरू सर्वांना सुरक्षित ठेवतील. आपण करोनाविरुद्धची ही लढाई नक्कीच जिंकू. अशा आशयाचे ट्विट हरभजन सिंग याने केले आहे.

मोबाईल कोरोना चाचणी प्रयोगशाळा काय काम करणार?
ही प्रयोगशाळा प्रत्येक ठिकाणी जाऊन एका दिवसात १५०० नमुने गोळा करेल. यात आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल काही तासांत दिला जाईल. या मदतीमुळे कोरोना चाचणी वेगवान होईल आणि या आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वपूर्ण योगदान देता येईल. यामध्ये लोकांना विनामुल्य चाचणी करता येईल, तर काही लोकांना ५०० रूपये खर्च येऊ शकतो.