आयपीएलमध्ये ‘हा’ खेळाडू ठरणार सर्वात महागडा
क्रीडा

आयपीएलमध्ये ‘हा’ खेळाडू ठरणार सर्वात महागडा

नवी दिल्ली : आयपीएल २०२१साठी फेब्रुवारी महिन्यात लिलाव रंगणार आहेत. आयपीएलच्या लिलावाआधी सर्व संघांनी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली. अशा परिस्थितीत भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरेल याची भविष्यवाणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आकाश चोप्रा याने ट्विट करून काही अंदाज व्यक्त केले. त्यात तो म्हणाला की पंजाबने करारमुक्त केलेला फिरकीपटू मुजीब उर रहमान ७ ते ८ कोटींना विकला जाईल. ग्रीनला ५ ते ६ कोटींची बोली लागेल. मिचेल स्टार्क सर्वात महागडा खेळाडू ठरेल. आयपीएल इतिहासातील सर्वोच्च बोली त्याच्यावर लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. नवोदित जेमीसन ५-७ कोटींची दमदार कमाई करू शकतो. जेसन रॉय ४ ते ६ कोटींना विकला जाईल. मॅक्सवेल आणि कुल्टर नाईल यांनादेखील चांगली रक्कम मिळेल. आयपीएल काळात ते उपलब्ध आहेत का यावर सारं अवलंबून आहे, असं ट्विट त्याने केलं.

दरम्यान, यंदाच्या हंगामासाठी लिलाव ११ फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्या लिलावाआधी अनेक संघ आपापपसांत काही खेळाडूंची देवाण-घेवाण करत आहेत. रॉबिन उथप्पाला चेन्नईच्या संघाने राजस्थानकडून ट्रेड केलं आहे. लिलावाआधी असे अनेक ट्रेड दिसण्याची शक्यता आहे.