धक्कादायक ! कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी विदेश

धक्कादायक ! कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू

फायजरची करोना लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला पोर्तुगीज मधील असून कोरोनाची फायजरची लस घातल्यानंतर केवळ ४८ तासात तिचा मृत्यू झाल्यास निदर्शनास आले आहे. मृत्यू झाले सोनिया असेवेडो असे असून त्या ४१ वर्षाच्या होत्या. मात्र आता सोनिया यांच्या वडिलांनी संबधित संस्थांकडून त्यांच्या मृत्यूचे कारण सांगण्यात यावे, अशी मागणी केली आहे. सोनियाच्या मागे तिची दोन मुलं आणि पती असा परिवार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या सोनिया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच सोनिया यांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. ब्रिटननंतर फिनलॅण्ड आणि बुल्गेरियामध्येही अमेरिकन कंपनी असणाऱ्या फायजरची लस दिल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. मेलने दिलेल्या वृत्तानुसार सोनिया पोर्तो शहरामधील पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये कार्यरत होत्या.

याबाबत सोनिया यांच्या वडिल अबिलियो असेवेडो यांनी पोर्तुगीजमधील वृत्तपत्राला दिलेल्या महितीनुसार, सोनिया यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती. सोनिया यांना यापूर्वी कोणताही आजार झालेले नव्हता किंवा कोणत्याही आजाराचे साईड इफेक्ट्सही त्यांना झाल्याचं त्यांच्या आरोग्यासंदर्भातील जुन्या अहवालांमध्ये नमूद करण्यात आलेलं नव्हतं. सोनियाला कोणतीही व्याधी किंवा आजार नव्हता अशी माहितीही तिच्या वडिलांनी दिलं आहे.

तसेच सोनियामध्ये कोरोनाची कोणताही लक्षणं दिसत नव्हती. मात्र तिच्या मृत्यूच्या एक-दीड दिवस आधीच तिला लसीकरणासाठी स्वयंसेवक म्हणून कोरोनाची लस देण्यात आली होती. तिला अचानक काय झालं मला ठाऊक नाही. मात्र तिचा मृत्यू कसा झाला याचं उत्तर मला संबंधित संस्थांकडून हवं आहे, अशी मागणी सोनियाच्या वडिलांनी केली आहे.

दरम्यान, पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ३० डिसेंबर रोजी सोनिया यांना लस देण्यात आली होती आणि त्यांचा एक जानेवारी रोजी मृत्यू झाला. मात्र सोनियामध्ये लसीचे कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. त्यामुळे, सोनियाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे. त्यांच्या आधीच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये त्यांना कोणताही आजार नसल्याचे स्पष्ट होतं आहे, असंही पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीच्या या पत्रकात म्हटलं आहे.