मी तुमच्या मुलीसारखी, म्हणून पास करा, नापास झाल्यास लग्न मोडेल; इंटरमिजिएट परीक्षेत विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तरे
देश बातमी

मी तुमच्या मुलीसारखी, म्हणून पास करा, नापास झाल्यास लग्न मोडेल; इंटरमिजिएट परीक्षेत विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तरे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातीलच नव्हे तर जगभरातील शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. अशातच आता बोर्ड परीक्षाही सुरु झाल्या आहेत. अशातच देशातील काही राज्यांमध्ये  बोर्ड परीक्षाही पार पडल्या आहेत. बिहार बोर्ड परीक्षा देशातील सर्वात जलदगतीनं घेतली जाणारी बोर्ड परीक्षा आहे. बोर्ड परीक्षेचे निकालही लवकरच जाहीर केले जातील.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या परीक्षेदरम्यान कॉपी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी बिहार बोर्डाने भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. या भरारी पथकांना तपासणी करताना उत्तरपत्रिकेवर लिहिलेला मजेशीर मजकूर पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी लिहीलेली उत्तर पाहून भरारी पथकाचे कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. याचे कारण ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नांची योग्य उत्तर लिहिता येत नाहीत त्यांनी भन्नाट उत्तर लिहिलेली दिसून आली.

विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत अशी उत्तरे लिहिली आहेत, जे तुम्ही वाचल्यास तुम्हालाही हसू आवरणार नाही. यात एका विद्यार्थिनीने परीक्षेत पास झाले नाही तर लग्न मोडेल, म्हणून पास करण्याची विनंती केली आहे. त्या विद्यार्थिनीनं लग्न 26 मे रोजी असून नापास झाल्यास लग्न मोडलं जाईल. मी तुमच्या मुलीसारखी आहे. लग्न मोडून नये म्हणून पास करा, मोठे उपकार होतील, असं उत्तरात म्हटलं आहे.

तर परीक्षेत भक्ती चळवळीविषयी प्रश्न विचारला असता दुसऱ्या एका विद्यार्थाने लिहिले आहे की, महाशय, सविनय निवेदन मी बजरंगबलीचा भक्त आहे. मला हनुमानाची भक्ती करण्यासाठी 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीदरम्यान सुट्टी द्या. तसेच मला परीक्षेत पास करा तुमच्या चरणात लीन होईन, असं एका विद्यार्थ्यानं लिहिलं आहे.

तर कोरोना संसर्ग असून देखील बिहारमध्ये बोर्ड परीक्षा सुरु आहेत. लवकरच परीक्षांचा निकाल जाहीर होईल. एका विद्यार्थ्यानं उत्तरामध्ये कोरोना संसर्ग झाल्यामुळे अभ्यास करता आला नाही. त्यामुळे अभ्यास कमी झालाय, पास करा अशी विनंती केली आहे. काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत मोबाईल नंबर देखील लिहीले आहेत.