तर 100 दिवसात संपूर्ण पुण्यातील लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करू; मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांचा दावा
कोरोना इम्पॅक्ट

तर 100 दिवसात संपूर्ण पुण्यातील लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करू; मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांचा दावा

पुणे : राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी एक महत्त्वाच ट्वीट केलं आहे. पुण्यातील कोरानाच्या लसीकरणासंबंधी आपल्या काही योजना मांडल्या आहेत. ”सरकारने परवानगी दिली तर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून येत्या 100 दिवसात संपूर्ण पुण्यातील लोकसंख्येचे लसीकरण केले जाऊ शकतं. पुण्यातल्या लसीकरणाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडे सर्व सुविधा उपलब्ध असून त्या संबंधी प्लॅनही तयार आहे.” असं मेहता यांनी म्हंटल आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यासंदर्भात बोलताना सुधीर मेहता म्हणाले की, “पुण्यातल्या लसीकरणाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडे सर्व सुविधा उपलब्ध असून त्या संबंधी प्लॅनही तयार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अशी परवानगी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सला मिळाली तर ही जबाबदारी पार पाडायला आम्ही समर्थ आहोत. म्हणजेच कोरोनाच्या लसीकरणाचा खर्च हा आरटीपीसीआर चाचणीच्या एक चतुर्थांश आहे. आपण जर पुण्यात दर दिवशी एक लाख लोकांना कोरोनाची लस दिली तर येत्या दोन महिन्यात पुण्यातल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकेल.”

सुधीर मेहता पुढे म्हणाले की, “पुण्याची लोकसंख्या जवळपास 75 लाख आहे. त्यामध्ये जवळपास 33 लाख लोकसंख्या ही 20 वर्षाच्या आतील आहे. त्यामुळे त्या वरील असणारी 42 लाख लोकसंख्येचे लसीकरण करणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन असे 84 लाख कोरोनाचे डोस आवश्यक आहेत. पण 60 ते 65 टक्के लोकसंख्येला सध्या कोरोनाच्या लसीची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास 25 लाख लोकसंख्या आणि त्यांच्यासाठी 50 लाख कोरोनाचे डोस इतके ध्येय साध्य झाले तरीही सर्व पुण्याचे लसीकरण होईल.”

पुण्यातल्या कोरोनाची स्थिती, आतापर्यंतचे कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे झालेले मृत्यू लक्षात घेता पुण्यातील कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाच्या लसीकरणाचा वेग त्याहून जास्त वाढवणे हाच एकमेव मार्ग आहे, असंही ते म्हणाले. सुधीर मेहता यांनी पुण्यातील कोरोना लसीसंबंधी काही योजना मांडल्या आहेत. ते म्हणतात की या 25 लाख लोकसंख्येपैकी 10 लाख लोकसंख्या ही 40 वर्षावरील आहे आणि 15 लाख लोकसंख्या ही 20 ते 40 वर्षामधील आहे. यांच्यासाठी 50 लाख कोरोनाचे डोस द्यायचे तर खालील तीन प्रकारे ते देता येतील.

यानुसार, पहिले म्हणजे दर दिवशी 25 हजार डोस असे 200 दिवस, दुसऱ्या टप्प्यात दर दिवशी 50 हजार डोस असे 100 दिवस आणि तिसऱ्या टप्प्यात दर दिवशी 75 हजार डोस असे 70 दिवस. या नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी करायची झाल्यास सर्व प्रशासन आणि हॉस्पिटल्सना त्याची तयारी करवी लागेल. येत्या 100 दिवसात पुण्यातील नागरिकांचे लसीकरण करायचे असेल तर केंद्र सरकारने पुण्यासाठी 50 लाख कोरोनाचे डोस उपलब्ध करुन द्यावेत.