कोरोना रुग्णसंख्येत वाढ; मुख्यमंत्री ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद
बातमी महाराष्ट्र

कोरोना रुग्णसंख्येत वाढ; मुख्यमंत्री ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद

मुंबई : राज्यातील कोरोना वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी सात वाजता ते जनतेला संबोधित करती. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले होते, त्यानंतर आज मुख्यमंत्री संचारबंदी किंवा निर्बंधांबाबत काही निर्णय घेणार का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध कठोर करण्यात आले आहेत.विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.

त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. कोरोना महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी वेळोवेळी संवाद साधत मार्गदर्शन आणि धीर दिला. राज्यातील जनतेनेही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यामध्येही यश मिळाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली. तर मुंबई, पुण्यासह विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांतही रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

त्यामुळे तीन जिल्ह्यांत कडक निर्बंध लग्वुअत आले असून पुण्यातही सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील सलग दुसऱ्या दिवशी सहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली.