पुण्यात पुन्हा लॉकडाऊन की अफवा? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण
पुणे बातमी

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन की अफवा? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांचे वाढती संख्या लक्षात घेता प्रसासनाने पुणे शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोना आणि लॉकडाऊनबाबत अफवा देखील पसरवल्या जात आहेत. अशातच पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र पुण्यात लॉकडाऊन करण्याबाबत कुठलेही आदेश नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. ”पुण्यात काही जुन्या माहितीचे व्हिडीओ, फोटो वापरत ठराविक भागांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथेही लॉकडाऊन लागू केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामुळं जनमानसात संभ्रमाचं वातावरणही निर्माण झालं आहे. पण, तूर्तास पुण्यात कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात आलेली ‘पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन’ अशा आशयाचा एका चॅनेलचा जुन्या बातमीचा व्हिडीओ पुन्हा एकदा कोणीतरी व्हायरल केला आहे. सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. असेही डॉ देशमुख यांनी म्हंटले आहे.

तर हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमांक तसेच ग्रुपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. कृपया, कोणीही अफवा पसरवू नये, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ”या अंतर्गत जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे सहावाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे शहर, आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शहरात रात्री ११ ते पहाटे सहादरम्यान संचारबंदी लागू राहील. पुण्यामध्ये हॉटेल सुरू ठेवण्यासाठी रात्री ११ पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. तसेच, शहरातील कोचिंग क्लासेस बंद राहतील. मात्र अभ्यासिका सुरू राहतील. तसेच महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच लग्नसोहळ्यासाठी केवळ २०० जणांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न/समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही लग्नाला परवानगी नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

तर पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच जारी केली जातील. उच्च शिक्षण घेणारे वर्ग अर्ध्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये वावर मर्यादित करण्यासाठी पत्रे लावले जातील. तसेच संचारबंदी लागू न करता नियंत्रित संचारावर भर दिला जाईल. या नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे.